देविका सिहागला थायलंड मास्टर्सचे जेतेपद

सुपर ३०० दर्जा
भारताची २० वर्षीय युवा बॅडमिंटनपटू देविका सिहागने बँकॉक येथे झालेल्या थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.

विजयाचे ठळक मुद्दे

अंतिम सामना गोह जिन वेई (मलेशिया) विरुद्ध
आघाडी २१-८, ६-३
निकाल प्रतिस्पर्ध्याची माघार (पायाची दुखापत)
ऐतिहासिक कामगिरी: पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यानंतर 'सुपर ३००' दर्जाची स्पर्धा जिंकणारी देविका ही तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

देविकाचा आतापर्यंतचा प्रवास

जागतिक क्रमवारी: विजयापूर्वी ६३ व्या स्थानी.
ऑगस्ट २०२५: मलेशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धा विजेती.
२०२५ जागतिक विद्यापीठ स्पर्धा: मिश्र सांघिक गटात कांस्यपदक.
प्रशिक्षण: पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स (प्रशिक्षक: उमेद राणा).